‘त्या’ प्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या अडचणीत वाढ
सरपंचाला अटक कारवाई वाढवणार अडचणी, बघा नेमके काय आहे प्रकरण
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने १९ बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण नंतर आरोप करण्यात आल्यानंतर संबंधित बंगले जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. पण आता त्या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
कोर्लई गावातील कथित १९ बंगले घोटाळा प्रकरणात रेवदंडा पोलिसांनी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली आहे. काल रात्री पोलिसांनी मिसाळांवर अटकेची कारवाई केली आहे. त्यामुळे रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. फसवणूक आणि बनावट दस्तावेज बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे कोर्लही येथे जमीन आहे. या जागेत असलेल्या कथित बंगल्या प्रकरणी सोमय्यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कोलई येथील कथित १९ बंगले प्रकरणात रेवदंडा पोलिसांनी ६ जणांविरुध्द गुन्हे दाखले केले होते. दरम्यान “रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात १९ बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच या जागेत कथित १९ बंगल्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बाब लपवून ठेवली असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने करीत आहेत.
रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी २०१४ मध्ये अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई गावातील जागा तिथे झालेल्या बांधकामासह विकत घेतली. या जागेवर १९ बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायतीत होती. त्याची घरपट्टी अन्वय नाईक भरायचे, असा आरोप आहे. आता पोलिसांचा तपास रश्मी ठाकरेंपर्यंत येणार का, हेच पाहणं औत्सुक्याच आहे.