लव्ह मॅरेज नंतर पत्नीचे वागण्याने पतीची टोकाची भुमिका
पोलीस तपासात धक्कादायक खुलासा, नात्यात का आला तणाव
बिहार दि ७(प्रतिनिधी)- पती पत्नीचे नाते विश्वासावर अवलंबून असते पण त्याचा अभाव असेल तर नात्यात तणाव निर्माण होतो. बिहारमध्ये एका व्यक्तीने पत्नी आणि चार महिन्यांच्या मुलाची हत्या करून मृतदेह गंगा नदीत फेकून दिल्याची घटना घडली आहे. पत्नीचे आपल्याच भावाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत पतीने हे कृत्य केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्या कुमारी आणि आशीष कुमारचा दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. पण दिव्या तिच्या दिराच्या प्रेमात पडली होती, यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. त्यामुळे दिव्या माहेरी गेली होती, मात्र यादरम्यान पतीने मित्रासोबत तिच्या हत्येचा कट रचला. त्याने दिव्याला माहेरून सासरच्या घरी आणले आणि त्यानंतर रात्री पत्नी आणि मुलाला नशेचे इंजेक्शन दिले. त्यामुळे पत्नी आणि मुलगा बेशुद्ध झाले. यानंतर त्याने दोघांनाही रुग्णवाहिकेतून घेऊन जात मित्राच्या मदतीने पत्नी आणि चार महिन्यांच्या मुलाला गंगा नदीत फेकून दिले. आणि घरी परतल्यावर पत्नी पळून गेल्याचा बनाव रचला.पण त्याचे बिंग फुटले.
दिव्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. चौकशी केल्यानंतर पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली पत्नीचे आपल्याच भावाशी अनैतिक संबंध असल्याचं पतीचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच खून केल्याचे त्याने कबूल केले आहे.