ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर कमबॅक
आगामी रिऍलिटी शो मध्ये या बाॅलीवूड अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रीन
मुंबई दि ७(प्रतिनिधी) सोशल मिडीयावर आपल्या वेगवेगळ्या फॅशन स्टाईलमुळे आघाडीवर असलेले एक नावं म्हणजे उर्फी जावेद.ती तिच्या फॅशनसाठी कायम चर्चेत असते. पण आता ती एका रिऍलिटी शोमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे सनी लिओनी बरोबर ती स्क्रीन शेअर करणार आहे.
उर्फी सोशल मिडीयावर खूपच प्रसिद्ध आहे. तिच्या विचित्र फॅशनमुळे तिचे फाॅलोअर्स देखील लाखाच्या घरात आहेत. एमटीव्ही’ वरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘स्प्लिट्सविला’ मध्ये उर्फी सनीबरोबर दिसणार आहे. १२ नोव्हेंबरपासून ‘एमटीव्ही’वर हा कार्यक्रम होणार आहे. उर्फी म्हणाली की, “मी अनेक वर्षांपासून ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला’ बघत आले आहे आणि या कार्यक्रमाचा आपणही कधीतरी भाग व्हावं हे माझं बऱ्याच वर्षांपासूनचं स्वप्न होतं. त्यामुळे आता या कार्यक्रमासाठी माझी निवड होणं हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे.अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. आता या कार्यक्रमात उर्फी आपल्या फॅशन स्टाईलने सनीला आव्हान देणार की टीकेची शिकार होणार हे कार्यक्रम सुरु झाल्यानंतर दिसणारच आहे. पण उर्फी ब-याच मोठ्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

कपडे आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच ट्रोलर्साच्या निशाण्यावर असणा-या उर्फीने आतापर्यंत ‘दुर्गा’, ‘सात फेरों की हेराफेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.