Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवार यांच्यासह बंडखोर आमदार शरद पवारांच्या भेटीला

राज्याच्या राजकारणात नवीन भुकंपाची चाहूल?, जोरदार टिकेनंतर पवारांची भेट, महायुतीत अस्वस्थता

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात सुरु असलेले धक्कातंत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शरद पवार यांना धक्का देत अजित पवार आणि समर्थक आमदारांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. त्यातच अजित पवार आणि समर्थक मंत्री आमदार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवारांसह गेलेल्या आमदारांनी वाय. बी. सेंटरवर शरद पवारांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवारांनी एकमेकांविरोधात कठोर भूमिका जाहीर केली होती. शरद पवारांवर टीका करताना अजित पवारांनी शरद पवार यांचे वय झाले आहे. त्यांनी आता थांबावे असे वक्तव्य केले होते. तर शरद पवार यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा घेण्याचा निर्धार केला होता. छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेत पवारांनी जनतेची माफी मागितली होती. त्यामुळे आता या भेटीकडे अनेक अर्थांनी पाहिले जात आहे. उद्यापासून राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे ही भेट अनेक अर्थांनी महत्वाची मानली जात आहे. अजित पवार यांच्यासह हसन मुश्रीफ,आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आदी नेते शरद पवारांच्या भेटीला गेले होते. “शरद पवारांच्या पाया पडत आम्ही आशीर्वाद मागितले. आम्हा सगळ्यांच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच. पण राष्ट्रवादी एकसंघ कसा राहील याच्यासाठीही त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावं अशी विनंती केली. शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांन आमची मंत. विचार, विनंती ऐकून घेतली” अशी माहिती पटेल यांनी यावेळी दिली आहे.

अजित पवार सर्मथनं आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शतद पवार यांच्या गटाची बैठक सुरु झाली आहे. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे नेते या बैठकीत सहभागी झाले आहेत. शरद पवार आता अजित पवार गटाची मागणी मान्य करतात की, विरोधात राहणे पसंत करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान आगामी काळात आणखी एक राजकीय भुकंपाची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!