प्रसिद्ध अभिनेत्याचे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल वादग्रस्त विधान
अभिनेत्रीचे चोख प्रत्युत्तर म्हणाली हे लिंगभेद करणारे, स्त्रीचा अपमान करणारे विधान, मात्र अभिनेत्याचा माफी मागण्यास नकार
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- फिल्मी जगत वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असते. आताही साऊथमध्ये एका अभिनेत्याच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. मन्सूर अली खानने अभिनेत्री त्रिशा कृष्णनबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्याच्या वक्तव्यावर दाक्षिणत्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णनचा काही दिवसांपूर्वी लिओ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात मन्सूर अली खानने खलनायकाची भूमिका साकारली आहे. पण एका पत्रकार परिषदेत मन्सूर म्हणाली की, ‘जेव्हा मला कळलं की मी त्रिशासोबत काम करत आहे, तेव्हा मी विचार केला की, आमच्यामध्ये एक बेडरूम सीन असेल, कारण मी अनेक रेप सीन्स केले आहेत आणि माझ्यासाठी हे काही नवीन नाही. पण ती सेटवर दिसली नाही. त्याच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी आणि संताप व्यक्त केली आहे.यावर त्रिशाने एक पोस्ट लिहित आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. ‘अलीकडेच एक व्हिडिओ आला आहे, ज्यामध्ये श्री मन्सूर अली खान यांनी माझ्याबद्दल असभ्य आणि घृणास्पद पद्धतीनं बोलत आहे. मी याचा तीव्र निषेध करते. हे लिंगभेद करणारे, स्त्रीचा अपमान करणारे विधान आहे. पुढं तिनं लिहलं, ‘त्याची इच्छा असेल पण मला त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली नाही याबद्दल मी आभारी आहे. पण माझ्या उर्वरित चित्रपट कारकिर्दीत असे कधीही होऊ नये, असे मला म्हणायचे आहे. त्यांच्यासारखे लोक मानवतेला बदनाम करतात’. असे म्हणत तिने मन्सुरच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान महिला आयोगाने देखील मन्सुरला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. तसेच पोलिसांनी मन्सूर अली खानविरोधात अभिनेत्री तृषा कृष्णनबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर मन्सूर अलीच्या त्या विधानानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे.
A recent video has come to my notice where Mr.Mansoor Ali Khan has spoken about me in a vile and disgusting manner.I strongly condemn this and find it sexist,disrespectful,misogynistic,repulsive and in bad taste.He can keep wishing but I am grateful never to have shared screen…
— Trish (@trishtrashers) November 18, 2023
मन्सूरने मात्र आपण माफी मागणार नाही. असे ठामपणे सांगितले. मला माझी बाजू मांडण्याची कोणतीही संधी देण्यात आलेली नाही. सिनेमात शोषण किंवा मर्डर सीन असले तर तो काही खरा असतो का? याचा अर्थ खरंच एखाद्याचं शोषण करणं असा होता का? मी काही चुकीचं बोललो नाही. मला कोणाची माफी मागायची काय गरज? मी सगळ्या अभिनेत्रींचा आदर करतो. असे मन्सूरनं म्हटले आहे.