Latest Marathi News
Ganesh J GIF

या कारणासाठी तरुणींची भररस्त्यात जोरदार हाणामारी

व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, एकमेकींवर खुर्च्या फेकत तरुणी आक्रमक, बघा नेमका वाद काय?

दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- प्रेमात अनेकजण कोणत्याही टोकाला जाण्यास तयार असतात. त्यामुळे प्रेमात मुलीसाठी मुलांमध्ये अनेकवेळा फ्री स्टाईल हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पण आता चक्क मुलासाठी मुलींमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

सोशल मिडीयावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यात दोन मुली एका  बॉयफ्रेंडसाठी भांडताना दिसत आहेत. या तरुणींचा हा वाद इतका टोकाला जातो की दोघींमध्येही भररस्त्यात मारामारी सुरू होते. याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, काळ्या ड्रेसमध्ये एक तरूणी आणि काळ्या जीन्स टीशर्टमध्ये दुसरी तरूणी या दोघीत वाद झाला आहे. जिन्सवाली मुलगी चहाच्या टपरीवर बसलेली असते. तेवढ्यात काळ्या ड्रेसमधील तरूणी तिथे येते आणि तिथ असणाऱ्या तरूणीला मारहाण करण्यास सुरूवात करते.एवढच नाहीतर ती त्या तरुणीला खुर्च्यादेखील फेकून मारते. हे होत असताना कोणीही त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत नाही. यावेळी दोघींनी एकमेकांना जोरदार खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान हा व्हिडिओ गोरखपूर मधील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान व्हायरल व्हिडिओ हा @gharkekalesh या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तरूणाला दोन गर्लफ्रेंड असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काहींनी हा वाद चुकीचा असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!