Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रसिद्ध अभिनेत्रीला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक

मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, तीन मॉडेल्सचीही सुटका, मोठ्या रॅकेटची शक्यता

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- मुंबई पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी छापा टाकल्यानंतर एका भोजपुरी अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन कुमारी नावाची ही भोजपुरी अभिनेत्री एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये एजंट म्हणून काम करत होती.

मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटी आणि त्यांचं ग्लॅमरस विश्व याची भूरळ सर्वसामान्यांना नेहमीच पडत आहे. पण या चमचमत्या आणि झगमगतच्या मागे त्याची दुसरी बाजू सुद्धा आहे. पण त्या बाजूकडे अनेक वेळा दुर्लक्ष केले जाते. मागील काही दिवसांपुर्वी मुंबईत एका अभिनेत्री-कास्टिंग डायरेक्टरला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीला हिला अटक केली आहे. वेश्याव्यवसायात ढकलण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी तिला अटक केली आहे. सुमन कुमारीवर मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे.एका पोलिस अधिकाऱ्याला वेश्याव्यवसायाची माहिती मिळाली होती. यानंतर सापळा रचत कारवाई करून गोरेगाव येथील रॉयल पाम हॉटेलवर छापा टाकण्यात आला, जिथे ही अभिनेत्री वेश्याव्यवसायासाठी अनेक मॉडेल्सचा पुरवठा करत होती. असे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारी ही मुंबईत सिनेमात करिअर करायला आलेल्या मॉडेल्सला हेरायची आणि या मॉडेल्सच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना वेश्या व्यवसायात ढकलायची. या कारवाईत पोलिसांनी तीन मॉडेल्सचीही सुटका केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून सुमन मुंबईत राहत आहे. पण वेश्याव्यवसायात काम करायला तिने कधी सुरुवात केली हे अद्याप समोर आलेलं नाही. याबद्दल पोलीस अधिक तपस करत आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सुमन कुमारीने अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्यांनी ‘लैला मजनू’ आणि ‘बाप नंब्री, बेटा दस नंब्री’ यांसारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री असण्यासोबतच सुमन एक गायिका देखील आहे, तिने हिंदी, पंजाबी आणि भोजपुरीसह अनेक भाषांमध्ये गाणीही गायली आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!