Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात ओला, उबेर रिक्षा ‘या’ कारणाने बंद होणार?

परिवहन प्राधिकरणाचा मोठा निर्णय, सविस्तर वाचा काय आहे कारण?

पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतलेल्या एका निर्णयामुळे शहरातील ओला, उबेर रिक्षा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वस्त आणि चांगली सेवा म्हणून ओला उबेरकडे पाहिले जात होते पण ही सेवा बंद होण्याची शक्यता असल्याने पुण्यातील वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा एैरणीवर आला आहे.

मोटार वाहन मार्गदर्शक सूचना २०२० नुसार आवश्यक बाबींती पूर्तता होत नसल्याने मे. अॅनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे, मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., मे. किव्होल्युशन टेक्नॉलॉतीत प्रा. लि. पुणे आणि मे. रोपन ट्रान्सपोर्ट्रेशन सर्व्हिस प्रा. लि. पुणे या चार कंपन्यांना तीनचाकी रिक्षांचे अॅग्रीगेटर लायसन्स पुणे आरटीने नाकारले आहे. पुणे आरटीओकडे ओला, उबेर, रॅपीडसह शहरातील एका कंपनीने अर्ज केले होते. यामध्ये ओला, उबरने तीन चाकी आणि चारचाकीसाठी अर्ज केला आहे, तर इतर कंपन्यांनी तीन चाकीसाठी अर्ज केले होते. पुणे प्रदेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत चार कंपन्यांचे अॅग्रीगेटर लायसन्स नाकारताना या अर्जांचा विचार करण्यात आला. आता तसेच ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा.लि. व मे. उबेर इंडिया यांना चारचाकी हलकी मोटार वाहने परवाना जारी करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. दरम्यान ओलो, उबेर रिक्षा सेवा सर्वत्र होती. आता ती बंद होणार असल्याने पुणेकरांना पर्यायी वाहतूक मार्ग शोधावा लागणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडीमधील सुमारे ४० ते ४५ हजार रिक्षांनी ओला, उबेर या कंपन्यांशी करार केला होता. आरटीओच्या आदेशामुळे आता पुणे शहरात ओला आणि उबेर सर्विसच्या तीन चाकी वाहनांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यात प्रवास करण्यासाठी पुणेकर साधारण स्वत:चं वाहन नसल्यास पीएमटी, रिक्षा, कॅब किंवा ओला उबर रिक्षाचा वापर करतात. त्यात सर्वात जास्त पुणेकर स्वस्त आणि परवडणारी सेवा ओला, उबेर कडून सेवा पुरवणाऱ्या रिक्षांचा वापर करतात. आरटीओने घेतलेल्या या निर्णयामुळे आता पुण्यात ओला, उबेर रिक्षा बंद होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!