Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रसिद्ध अभिनेत्रीचे होते या विवाहित अभिनेत्याबरोबर अफेअर

वादासोबत आहे अभिनेत्रीचे नाते, अनेक ब्रेकअपनंतरही कमालीचा यशस्वी अभिनेत्री

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- चित्रपट निर्माते मणिरत्नम यांच्या लोकप्रिय फ्रँचायझी चित्रपट ‘पोन्नियिन’चा दुसरा भाग रिलीज झाला आहे. चित्रपटाचा पहिला भाग प्रसिद्ध लेखिका कल्की कृष्णमूर्ती यांच्या याच नावाने लिहिलेल्या कादंबरीवर आधारित होता. चित्रपटाने जोरदार व्यवसाय केला आहे. त्रिशा कृष्णनने ‘पोन्नियिन सेल्वन’ मधील राजकुमारी कुंदावईच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

अभिनय आणि सौंदर्याच्याही बाबतीत ऐश्वर्या राय बच्चनला मागे टाकणाऱ्या त्रिशा कृष्णनची सध्या चांगलीच चर्चा आहे. साऊथमध्ये लोकप्रिय असणाऱ्या त्रिशाने बॉलीवूडच्याही अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्रिशा तिच्या अभिनयाबरोबरच खासगी आयुष्यातील वादांमुळेच बरीच चर्चेत आली. त्रिशाचे नाव सर्वप्रथम साऊथचा सुपरस्टार विजयसोबत जोडले गेले होते. २००५ मध्ये त्रिशा आणि थलपथी विजयच्या कथित अफेअरची चांगलीच चर्चा रंगली. ‘घिल्ली’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. त्यामुळे विजयचे वैवाहिक आयुष्यही अडचणीत आले होते. मात्र नंतर ते दोघे वेगळे झाले. त्रिशाने डिसेंबर २०१५ मध्ये उद्योगपती वरुण मनियानबरोबर साखरपुड्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, पाच महिन्यांनंतर त्रिशा आणि वरुणचे नाते तुटले. पण महत्वाचे म्हणजे त्रिशाचे नाव बाहुबली फेम राणा डग्गुबतीशी जोडण्यात आले होते. तेव्हा दोघांचे इंटिमेट फोटो लीक झाले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. ४ मे १९८३ रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या त्रिशाचे नाव धनुषबरोबरही जोडण्यात आले होते. पण ते ही नंतर तुटले होते.

त्रिशा दक्षिण भारतासाठी पेटाची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर आहे. त्यादरम्यान त्यांनी जल्लीकट्टूविरोधात वक्तव्य केले होते. त्यावेळी झालेल्या टिकेमुळे तिला स्वतःचे ट्विटर अकाऊंटही बंद करावे लागले होते. पण सध्या तिची लोकप्रियता जोरदार वाढली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!