Latest Marathi News
Ganesh J GIF

अभिनेत्री खासदार ‘त्या’ बोल्ड व्हिडिओमुळे जोरदार ट्रोल

व्हिडिओतील पोजमुळे खासदार टीकेच्या धनी, नेटकऱ्यांनी खासदार असल्याची केली आठवण

दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां या राजनेत्या असण्यासोबतच बंगालमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री देखील आहे.वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे त्या सतत चर्चेत असतात. पण आता त्या एका वैयक्तिक व्हिडिओमुळे ट्रोल झाल्या आहेत.


सोशल मीडियावर कमालीच्या सक्रिय असणाऱ्या नुसरत या सतत त्यांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अशातच आता त्यांनी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या आणि त्यांचा जोडीदार यश दिसत असून, ते रोमँटिक अंदाजमध्ये आहे. त्यांच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून, तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. नुसरत यांनी यशासोबत या व्हिडिओमध्ये अनेक बोल्ड आणि आकर्षक पोज दिल्या असून, त्यांची केमिस्ट्री सध्या चर्चेचा विषय बनला आहे. असे असले तरी या व्हिडिओमुळे आता नुसरत चांगलीच ट्रोल होत आहे. अनेकांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील केले आहे. एकाने लिहिले, “ही जोडी हिट आहे’, तर दुसऱ्याने लिहिले, “अनेकदा पहिला हा व्हिडिओ’ तर काहींनी त्यांना ट्रोल करत लिहिले, “तुला खासदार कोणी बनवले?’ अजून एकाने लिहिले, “तू नेहमीच विसरते की तू एक खासदार आहे. दरम्यान नुसरत ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती समजल्या जातात.

नुसरत तृणमूल काँग्रेसच्या खासदार असून पश्चिम बंगालमधील बरिसरहट येथून त्या निवडून आल्या आहेत.आपल्या भाषणांबरोबरच आणि राजकीय भूमिकेबरोबरच त्या त्यांच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळेही चर्चेत असतात. ती सिने आणि राजकीय करिअर दोन्हीकडे यशस्वी ठरली आहे. नुसरत जहांने २०१० मध्ये मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!