प्रसिद्ध अभिनेत्रीचे या निर्मात्यावर लैंगिक छळाचे आरोप
इंस्टाग्राम पोस्ट करत सांगितला भयानक प्रसंग, म्हणाली गेम शोच्या नावाखाली त्यांनी माझे....
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- महान काव्य रामायणवरती मालिकेची निर्मिती करणारे रामानंद सागर यांची पणती सध्या चर्चेत आली आहे. तिने थेट नेटफ्लिक्सच्या निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहेत. रामानंद सागर यांची नात साक्षी चोप्रा हिच्या इंस्टा पोस्टची सध्या चर्चा होत आहे.
साक्षीने नेटफ्लिक्स शोच्या निर्मात्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. साक्षी चोप्राने एक इंस्टा पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने लिहिले आहे की, “लैंगिक छळ, दिवसाला एका कॉलचे वचन देण्यात आल्याने मी कॉन्ट्रॅक्ट साइन केला होता. पण नेटफ्लिक्सने एक वर्षाहून अधिक काळ माझा पाठलाग केला, अगदी मला खात्री पटावी, यासाठी एका रिस्पेक्ट टीमची मीटिंगही आयोजित करण्यात आली. मी सुरुवातीला नकार दिला, पण मला खूप कॉल व मेसेज आले. हा फक्त एक गेम शो आहे ज्यात गाणे, कंटेंट मेकिंग अशी मनोरंजनात्मक कार्ये आहेत यावर माझा विश्वास बसवण्यात आला. त्यांनी आम्हाला जेवणही दिले नाही,” तसेच त्यांना वाटले की मी या घाणेरड्या गोष्टीत सहज सहभागी होईन. पण मला संगीत, कुटुंब, आत्म-अभिव्यक्ती आणि शांतता आवडते. मला आयुष्यात हेच हवे आहे. मला अगदी स्पष्ट होते की जर मला एक दिवसही फोन आला नाही तर मी सही करणार नाही, कारण मी माझ्या आईशिवाय जगू शकत नाही. तिने या सर्व गोष्टी स्वीकारण्याचे आश्वासन दिले होते, परंतु शोमध्ये सामील झाल्यानंतर त्याची पर्वा केली नाही. असा दावा तिने केला आहे. एका स्पर्धक मृदुल माझ्या स्तनांबद्दल आणि माझ्या नितंबाबद्दल उघडपणे बोलला. खरंच एक गेम शो आहे का?” असा प्रश्न साक्षीने विचारला आहे.
साक्षी चोप्रा सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. ती तिच्या अतरंगी आउटफिट आणि बोल्ड अवतारामुळे चर्चेत असते. साक्षी कायम तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. साक्षी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. साक्षी चोप्राच्या आरोपांवर नेटफ्लिक्सने अद्याप आपले अधिकृत विधान जाहीर केलेले नाही.