Latest Marathi News
Ganesh J GIF

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेत आत्महत्या

आत्महत्येमागे धक्कादायक कारण समोर, अभिनेत्रीच्या आईकडून घातपाताचा संशय, त्या व्हिडीओची जोरदार चर्चा

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे आयुष्य किती बेभरवशाचे असते, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. कारण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री रेंजुषा मेनन हिने वयाच्या ३५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. तिचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

अभिनेत्री रेंजुषा मेनन हिने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. रेंजुषा तिच्या पतीसोबत फ्लॅटमध्ये राहत होती आणि आर्थिक संकटाचा सामना करत होती. रंजूषा साऊथ इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय होती. ती तिच्या सहकलाकारांसोबत व्हिडिओ बनवत असायची कालच २९ ऑक्टोबर रोजी तिने एक रील देखील शेअर केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अभिनेत्रीने हे पाऊल का उचलले? आणि गळफास का लावून घेतला? याचे कारण सध्या तरी आर्थिक परिस्थिती सांगितले जात असले तरी पोलीस तपास करत आहेत. तिच्या रीलवरून सर्व काही ठीक असल्याचं दिसत होते मात्र दुसऱ्या दिवशी तिनं तिचा जीव संपवला. यामुळे खळबळ उडाली आहे.दरम्यान अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची माहिती समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रंजूषा ही मागील काही दिवसांपासून आपला नवरा आणि मुलांबरोबर श्रीकार्याम येथे भाडेतत्त्वार घेतलेल्या घरात राहत होती. पोस्टमार्टम नंतर चित्र स्पष्ट होणार आहे. तिच्या आईने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. रेंजुषा मेननने मालिका आणि सिनेमात येण्यापूर्वी टीव्ही शो अँकर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

रंजुषाला इन्स्टाग्रामवर ६,६५२ फॉलोवर्स आहेत. तसेच रंजूषा ही तिच्या विविध लूक्समधील फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत होती. रंजूषाच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत होती. रंजूषाच्या निधनानंतर आता मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!