प्रसिद्ध अभिनेत्रीची दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या
अभिनेत्रीच्या हत्येने खळबळ, पोलीसांकडुन धक्कादायक खुलासा
कोलकत्ता दि २८(प्रतिनिधी)- कोलकत्ता मध्ये झारखंडमधील लोकप्रिय अभिनेत्री ईशा आलियाची हत्या करण्यात आली आहे. रांची-कोलकाता मार्गावर बुधवारी सकाळी तिच्यावर गोळी झाडण्यात आली. दरोडेखोरांनी ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री ईशा आलिया तिच्या पती आणि तीन वर्षांच्या मुलीसोबत कोलकत्ताला जात असताना ईशाच्या पतीला तीन अज्ञात व्यक्तींनी लुटीच्या उद्देशाने धमकावायला सुरुवात केली. पतीला चोरट्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी ईशा गेली असता चोरट्यांनी तिच्यावर गोळीबार केला. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी अभिनेत्रीला मृत घोषित केले. रियाचा पती प्रकाश कुमारने दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावरील दरोडेखोरांनी तिची हत्या केली आहे. मात्र, पोलीस याकडे संशयास्पद म्हणून पाहत आहेत. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तनिषाच्या आत्महत्येला काही दिवसच झाले असताना आणखी एका अभिनेत्रीच्या हत्येने चंदेरी दुनियेला धक्के बसत आहेत.
अभिनेत्रीचं खरं नाव रीता कुमारी असं आहे. पण तिचं स्क्रिनवर नाव ईशा आलिया असं आहे. खोरठा आणि प्रादेशिक भाषांच्या अल्बममध्ये तिने काम केलं आहे. अभिनेत्रीच्या हत्येने खळबळ उडाली आहे.