Latest Marathi News
Ganesh J GIF

सोशल मीडिया स्टार मुलीची गळफास घेत आत्महत्या

पोलीसांकडुन तपास सुरु,टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक चर्चांना उधान

रायगड दि २८(प्रतिनिधी)- छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील सोशल मीडिया स्टार लीना नागवंशीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना रायगडमधील केलो बिहार कॉलनीत घडली. घरातील छताला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. तिच्या आत्महत्येची चाैकशी पोलीसांनी सुरु केली आहे.


लीना नागवंशी सोशल मीडियावर खुप प्रसिद्ध होती. व्हिडिओज आणि फोटो पोस्ट करत असायची. इन्स्टाग्रामवर तिचे १० हजार पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. लीना नागवंशी सोशल मीडियावरील विव्यू कमी झाल्याने चिंतेत होती असे सांगितले जात आहे. पोलीस घटना स्थळावर पोहोचण्याआधीच कुटुंबीयांनी लीला हिचा लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह खाली उतरवला होता.त्यामुळं कुटुंबीय देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवलं आहे. पोस्टमार्टच्या रिपोर्टनंतरच मृत्यूचं खरं कारण कळू शकणार आहे. सध्या लीनाच्या मृतदेहाजवळ पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलिसांनी लीना नागवंशीचा फोन देखील जप्त केला आहे.रायगढचे सीएसपी अभिनव उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार लीला नागवंशीनं आत्महत्या १ वाजण्याच्या सुमारास केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं दाखल झाले होते. सध्या पोलीस तपास करत आहेत.

लीना २२ वर्षाची होती.तसेच सोशल मीडिया स्टार देखील होती आणि नेहमी चर्चेत असायची. बीकॉमच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली लिना सोशल मीडियात सक्रीय असायची. महत्वाचे म्हणजे ख्रिसमसल एक व्हिडिओ देखील तिने अपलोड केला होता. पण तिने अचानक आत्महत्या केल्याने अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!