Latest Marathi News

…म्हणून मुलींनी दांडक्याने केली मुख्यध्यापकाची धुलाई

धुलाईचा व्हिडिओ व्हायरल, धक्कादायक कारण समोर

कर्नाटक दि २८(प्रतिनिधी)- एका शाळेच्या मुख्याध्यापकाची युवतींनी लाथाबुक्क्यांनी धलाई केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर पीडितेने इतर विद्यार्थिनींसह त्याला मारहाण केली.

कर्नाटकच्या मांड्या येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मारहाण केली. त्यानंतर मुख्यध्यापकाला पोलीसांनी अटक केली आहे. श्रीरंगपट्टणच्या काटेरी गावात ही घटना घडली. चिन्मयानंदमूर्ती असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, विद्यार्थीनी एका व्यक्तीला लाथाबुक्क्या, दांडक्यानी मारहाण करत आहेत. या दरम्यान एक विद्यार्थिनी म्हणतेय- तुम्ही तिला का हात लावला सर? तुम्ही प्रिन्सिपल आहात ना? शाळेच्या एका विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, मुख्याध्यापकांनी आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.’ तिने हा प्रकार इतर मुलींना सांगितल्यानंतर सर्व मुलींनी मुख्यध्यापकाची धुलाई केली आहे.
सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

चिन्मयानंदमूर्ती गेल्या ६ वर्षांपासून हायस्कूल शिक्षक म्हणून काम करत आहे. मुख्याध्यापकांवर अश्लील व्हिडीओ दाखवून तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!