Just another WordPress site

आमदार राजेंद्र राऊतांच्या भावासह तिघांना न्यायालयीन कोठडी

राष्ट्रवादीचे नेते नागेश अक्कलकोटे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कारवाई

बार्शी दि २०(प्रतिनिधी)- बार्शी नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे तत्कालीन नगरसेवक गटनेते नागेश अक्कलकोटे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी आमदार राजेंद्र राऊत यांचे बंधू तसेच तत्कालीन गटनेते विजय राऊतांसह तिघांना न्यायदंडाधिकारी जे. ए. झारी यांनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तब्बल तीन तासाच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर तिघांना अटक करण्यात आली.

GIF Advt

नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांच्यावर १ ऑगस्ट २०१४ रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. हल्ला प्रकरणी विजय राऊत, दिपक राऊत, सोन्या हाजगुडे, मुन्ना बोते, डंग्या यादव, दिपक धावारे, रणजित चांदणे, प्रकाश राऊत, विशाल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी उच्च न्यायालयाने संशयित आरोपींचा जामिन फेटाळला होता. त्यामुळे अखेर विजय राऊत यांच्यासह दिपक ढावरे आणि रणजित चांदणे हे बार्शी शहर पोलीस ठाण्यात हजर झाले होते. तब्बल तीन तासाच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर तिघांना अटक करण्यात आली.माजी नगरसेवक विजय राऊतांसह दिपक ढावारे, रणजित चांदणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते नागेश अक्कलकोटे यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी जामीन फेटाळला सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील अॅड. प्रसाद कुलकर्णी यांनी बाजू मांडली तर संशयित आरोपींच्या वतीने अॅड सागर रोडे यांनी युक्तीवाद केला. सुमारे आर्धा तासाच्या सुनावणीनंतर न्यायाधीशांनी संशयित विजय राऊत यांचेसह इतर दोघांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!