Latest Marathi News
Ganesh J GIF

ड्रग्ज तस्करी प्रकरणात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

अटकेच्या घटनेने खळबळ, कुटुंबाचे सुटकेसाठी प्रयत्न, कुटुंबाचा या व्यक्तीवर आरोप

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील गाजलेल्या ‘सडक 2’ आणि ‘बाटला हाऊस’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री क्रिसन परेराला संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात तो शारजा मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. भारतीय दूतावासाने अभिनेत्रीच्या अटकेची माहिती कुटुंबीयांना दिली आहे.


ड्रग्ज प्रकरणात ख्रिसन जवळपास दोन आठवडे तुरुंगात बंद आहे. इकडे अभिनेत्रीचे कुटुंबीय तिच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. क्रिसनच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, “या प्रकरणात अभिनेत्रीला गाेवण्यात आले आहे.” क्रिसनचा भाऊ केविन म्हणतो, “गेल्या २ आठवड्यापासून आम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. माझी बहीण निर्दोष आहे आणि तिला ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकवण्यात आले आहे. क्रिसन जेव्हापासून विमानतळावर उतरली तेव्हापासून ते तिच्याशी बोलू शकले नाहीत.इंडियन कॉन्स्यूलेटने आम्हाला ७२ तासांनंतर कळवले की, तिला अटक करून शारजाह सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे अशी माहिती कुटुंबाने दिली आहे. क्रिसनला रवी नावाच्या व्यक्तीने फसवले. त्यानं सगळ्यात आधी कृष्णाची आई प्रेमिले परेरा यांच्याशी संपर्क साधला. रवी नावाच्या या व्यक्तीने सांगितले की तो एका इंटरनॅशनल वेब सीरिजसाठी कास्ट करत आहे, असा दावा अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी केला आहे.

 

क्रिसन परेरा ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने सडक २, बाटला हाऊस, थिंकीस्तान यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. क्रिसन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचे इन्स्टाग्रामवर १२ हजारांहून जास्त फॉलोवर्स आहेत. दरम्यान तिच्या अटकेमुळे खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!