Just another WordPress site

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूची गर्लफ्रेंडने केली सर्वांसमोर धुलाई

गर्लफ्रेंडने क्रिकेटरला बडवतानाचा व्हिडिओ व्हायरल, बीसीसीआय देणार दणका

मेलबर्न दि २१(प्रतिनिधी)- क्रिकेटपटूंचे नेहमीच सर्वसामान्यांना आकर्षण राहिलेले आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा अनेकांना रस असतो. पण सध्या मायकल क्लार्क चर्चेत आला आहे. मायकल क्लार्कवर त्याची प्रेयसी जेड यारब्रॉजने धोका दिल्याचा आरोप करत धुलाई केली आहे. सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.


सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये क्लार्कला त्याची गर्लफ्रेंड कानशिलात मारत आहे. क्लार्क जेड यारब्रोची बहीण जास्मिनला फटका मारतो. त्यामुळे त्याची गर्लफ्रेंड खुप संतापते आणि ती त्याच्या कानशिलात लगावते. क्लार्क व्हिडिओमध्ये म्हणत आहे की मी शपथ घेतो की हे खरे नाही. मी माझ्या मुलीची शपथ घेतो. मायकेल क्लार्क त्याची गर्लफ्रेंड यारब्रो, तिची बहीण जास्मिन आणि तिचा पती कार्ल स्टेफानोविकसह सुट्टीवर होता. असे सांगितले जात आहे की चौघेही जेवत होते, तेव्हा हा वाद झाला. यारब्रोची बहीण जस्मिन ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टीव्ही होस्ट आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान क्लार्कचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी क्लार्क समालोचना पॅनेलचा भाग होता, परंतु आता बीसीसीआय या वादाच्या पार्श्वभूमीवर क्लार्कला समालोचन संघातुन वगळण्याची शक्यता आहे. हा क्लार्कसाठी मोठा धक्का असू शकतो.

GIF Advt

विश्व कप विजेता ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधाराचे नाव सर्वात आधी मॉडेल लारा बिंगलशी जोडले गेले होते. त्यानंतर अनेक महिलांसोबत त्याचे नाव जोडण्यात आले. आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. क्लार्क ४१ वर्षाचा आहे तर त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रॉज ३० वर्षांची आहे. मायकल क्लार्कच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने २०१५ मध्ये विश्वचषक जिंकला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!