Just another WordPress site

मराठी अभिनेत्रीचे हे फोटो पाहुन चाहते पडले प्रेमात!

'आमच्याकडे पण बघत जा ग' म्हणत चाहत्यांच्या भन्नाट कमेंट,फोटो पाहून पडाल प्रेमात

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘प्राजक्तराज’ हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली आहे. आता ती पुन्हा तिच्या हक्काच्या  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर परतली आहे.

GIF Advt

प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालना करताना आपले सुंदर फोटोशूट केले आहे.गुलाबी, जांभळ्या रंगाचा वनपीस परिधान करून तिने चाहत्यांना घायाळ केले आहे. प्राजक्ताने जांभळ्या गुलाबी रंगाचा लॉन्ग वनपीस परिधान केला आहे. तर कानात रिंग्ज घालत आकर्षक हेअरस्टाईल करत गुलाबी रंगाची लिपस्टीक लावली आहे. या लूकमध्ये प्राजक्ताच्या सौंदर्याला चारचांद लागले आहेत. अखेर हास्यजत्रा फोटोशूट परत आले…असं कॅप्शन तिने या फोटोशूटला दिले आहे. तिच्या या फोटो पाहुन चाहते प्रेमात वेडे झाले आहेत. आमच्याकडे पण बघत जा ग नुसते खाली काय बघतेस, गौरव मोरे : आता ग माय मरतो की काय, प्राजक्ता परत लहान होत चालली … अशा भन्नाट कमेंट्स तिच्या चाहत्यांनी या फोटोवर केल्या आहेत. तर अनेक चाहत्यांनी हर्टचे इमोजी शेअर केले आहेत.

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत प्राजक्ताच्याच नावाचा बोलबाला आहे. ती जरी चित्रपटात कमी दिसत असली तरि तिचे लोकप्रियता शिखरावर आहे. तिने मध्यंतरी आपल्या प्राजक्तराजचे पारंपारिक दागिने घालत साडीत फोटोशुट केले होते. यावेळी तिच्या लुकची जोरदार चर्चा झाली होती. अनेकजण तिचे साठीतले खुललेले रुप पाहुन चकीत झाले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!