Latest Marathi News

संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो नाचवत घोषणाबाजी

वाशिममधला तो व्हिडिओ व्हायरल, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, शहरात तणाव

वाशिम दि १६(प्रतिनिधी)- वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर शहरात दादा हयात कलदंर यांच्या उरूस निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली होती. या रॅलीत औरंगजेबाचे फोटो घेऊन तरुण नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलीसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे शहरात तणावाचे वातवरण निर्माण झाले आहे.

अनेक वर्षापासून मंगरुळपीर येथे उरूसानिमित्त रॅली काढण्यात येते. शनिवारी निघालेल्या या रॅलीत काही जण चक्क औरंगजेबाचा फोटो हातात घेत नाचताना दिसले. काहींनी पाकिस्तानचे झेंडे झळकावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातच ऊर्ससाठी पोलिसांनी केवळ दोन ‘डीजें’ची परवानगी दिली होती. मात्र, तब्बल २१ ‘डीजे’ वाजवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दादा हयात कलंदर उरूसाच्या वेळी काही तरुण औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होते. या जुलुसामध्ये नारेबाजीही करण्यात आली. टिपू सुलतानचेही फोटो नाचवण्यात आले आहेत.या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाचा पुतळा जाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर मंगरूळपीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!