Latest Marathi News
Ganesh J GIF

वरुणराजाच्या साक्षीने भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप

पुण्यातील पाचही गणपतीचे विसर्जन, पुण्यातील विसर्जन मिरवणूकीच्या वेळेचे आकर्षण, गणेश भक्ताच्या मृत्यूचे गालबोट

पुणे दि २८(प्रतिनिधी)- मागील दहा दिवसापासून घराघरात विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यात आला. विसर्जनादिवशी वरुणराजाचे आगमन झाल्याने विसर्जन सोहळा आणखी रंगतदार झाला अर्थात पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचे विसर्जन झाले असून इतर मंडळाचे विसर्जन होण्यासाठी मात्र उद्याचा दिवस उजाडणार आहे. महाराष्ट्रातील इतर भागातही गणरायाल उत्साहात निरोप देण्यात आला.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ख्याती असलेल्या गणरायाला आज भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणा, ढोलताशाचा गजर आणि अनेकाविध देखावे यामुळे विसर्जन सोहळा खुपच रंगरदार होता. पुण्यातील मानाचे गणपती म्हणून ओळख असलेले कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी गणपती, आणि केसरीवाडा गणपतीला निरोप देण्यात आला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पहिल्या मानाच्या कसबा गणरायाचे विसर्जन झाले.तर सात वाजता पाचव्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. डेक्कन येथील महापालिकेच्या हौदामध्ये या पाचही गणपतींचे विसर्जन करण्यात आले. अर्थात पुण्यातील आकर्षण असणारा गणपती श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे अद्याप विसर्जन झालेले नाही. यंदा पहिल्यांदाच श्रीमंत दगडुशेठ हालवाई मंडळाच्या गणपतीचं प्रस्थान दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झालं. त्यानंतर तो ही मुख्य मिरवणूक मार्गात सामिल झाला आहे. यंदा मानाच्या गणपतींच्या विसर्जनासाठीच ९ तासांहून अधिक वेळ लागला. पुण्यातील गणेशोत्सव हा देशभरातील गणेशभक्तांसाठी, कलाकारांसाठी आणि हौशी पर्यटकांसाठी देखील उत्सुकतेचा विषय असतो. दरम्यान महाराष्ट्रातही गणरायाला आज निरोप देण्यात आला. पण कोकणात आणि मुंबईत गणरायाला निरोप देत असताना काही गणेशभक्तांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पण इतर ठिकाणी उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.

मिरवणुक मार्गावरील पदपथावर प्रचंड गर्दी झाल्याने पुढे जाण्यासाठी एकमेकांना ढकलण्याचे प्रकार समोर आले आहेत. मागील अनेक वर्षापासून पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला ३० तासाच्या आसपास वेळ लागायचा. पण यंदा मात्र नेहमीपेक्षा कमी वेळेत मिरवणुका संपतील असा अंदाज आहे. पण तरीही नेमकी किती तास याला वेळ लागेल हे पाहणे महत्वाचे आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!