Latest Marathi News
Ganesh J GIF

छगन भुजबळ तुरूंगातून सुटकेसाठी शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे

माजी आमदाराचा खळबळजनक गाैप्यस्फोट, राजकीय वातावरण तापणार, भुजबळांचा आजारावरही टोला

सोलापूर दि २८(प्रतिनिधी)- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील सुमारे ३१२ कोटींच्या घोटाळ्यात अडकलेले महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार रमेश कदम यांना नुकताच जामीन मंजूर झाला आहे. आता त्यांनी एक पत्रकार परिषद घेत धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

जामिनावर सुटका झाल्यानंतर कदम राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी गावभेट दाैरा सुरू केला आहे. त्या अंतर्गत ते पंढरपूर तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले, आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असताना छगन भुजबळ हे शरद पवार यांना ब्लॅकमेल करायचे. जामिनासाठी भुजबळांची धडपड सुरू होती. आपला जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा ते कायम शरद पवारांना देत असत, असा दावा कदम यांनी केला आहे. छगन भुजबळ तुरुंगात असताना माझी आणि त्यांची भेट होत असे त्यावेळी ते आपल्याशी या विषयावर बोलायचे असे देखील कदम म्हणाले आहेत. त्याचबरोबर जेलमधून सुटका करुन घेण्यासाठी भुजबळ हे रोज नव्या नव्या आजाराची कारणे शोधायचे पण त्यांना जामीन काही मिळत नव्हता. जेल मधून बाहेर पडण्यासाठी ते अगदी काकुळतीला यायचे. त्यांना सारखी उपचाराची गरज लागायची. त्यांच्या छातीत सारखं दुखायचं. पण जेलमधून बाहेर आल्यापासून त्यांच्या छातीत दुखतंय, अशी एकही बातमी आम्ही ऐकली नाही, असा टोलाही कदम यांनी लगावला आहे. भुजबळ यांनी थेट शरद पवार यांना कोणत्या आधारावर ब्लॅकमेल केले. याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अर्थात कदम यांच्या दाव्यानंतर राजकीय वातावरण तापणार असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान माझ्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे राजकीय आणि शासकीय यंत्रणेच्या द्वेषातून झालेले आहेत. मी एक रुपयाचा घोटाळा केलेला नाही. असेही कदम म्हणाले आहेत.

मोहोळ विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास मी पुन्हा इच्छुक आहे. गावभेट दौरा करुन लोकांची मत जाणून घेवून मी माझी राजकीय भूमिका जाहीर करणार आहे. लोकांचा मला उदंड प्रतिसाद आहे. अनेक पक्षांचे मला पक्षात येण्यासाठी निमंत्रण आहे. पण जनतेचा विचार घेऊनच आपण निर्णय घेणार असल्याचे रमेश कदम यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या राजकीय पुनरागमणामुळे मोहोळमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!