
मिस युनिव्हर्स अभिनेत्री करणार ‘या’ क्रिकेटपटूशी लग्न?
या क्रिकेटपटूसोबत डेट करत असल्याच्या चर्चा, बहिणीच्या लग्नातही लावलेली हजेरी, चाहत्यांमध्ये उत्सुकता
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- बॉलीवूडपासून साऊथ चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाने आपले वेगळे स्थान निर्माण करणारी पुजा हगडे ही नेहमी चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळेस मात्र पूजा वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. यावेळेस पुजाचे चर्चेत येण्याचे कारण मात्र वैयक्तिक आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
बाॅलीवूडमधील अनेक कलाकार सध्या लग्नबंधनात अडकत आहेत. नुकतेच परिणीती चोप्रा खासदार राघव चड्ढाशी विवाहबद्ध झाली. आता अभिनेत्री पूजा हेगडेगेखील लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पूजा एका क्रिकेटबरोबर लग्न करणार असल्याची चर्चा आहे. पूजा हेगडे एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची चर्चा होती. पण आता ते लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत पूजाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पूजा मुंबईतील एका क्रिकेटबरोबर लग्न करणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे याआधी पूजाचे नाव कर्नाटक येथील एका क्रिकेटरशी जोडण्यात आले होते. हा क्रिकेटपटू पूजाच्या बहिणीच्या लग्नाला देखील आला होता. मात्र, त्यांच्यामध्ये फक्त मैत्रीचे नाते असल्याचे पूजाने स्पष्ट केले होते. त्यानंतर चर्चा थांबल्या होत्या. यापूर्वी पूजाचे नाव हे अभिनेता सलमान खानशी जोडले गेले होते. पण त्या अफवा असल्याचे समोर आले होते. पुजानेही ‘याबद्दल मी काय सांगू? मी माझ्याबद्दल अशा बातम्या वाचत राहते. मी सिंगल आहे. मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.’ असे सांगितले होते. कामाबद्दल बोलायचे झाल्यास पूजा हेगडे शेवटची सलमान खानसोबत किसी का भाई किसी की जान सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिने २०१४ साली ऋतिक रोशनसोबत मोहेंजोदारो चित्रपटातून बाॅलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचे हिंदीत फारसे चांगले करिअर नसले, तरी पूजा हेगडे साउथ इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. तिने साउथमध्ये अनेक चांगल्या सिनेमातून नाव कमावले आहे.
क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे जवळचे नाते असल्याचे दिसून आले आहे. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी लग्न केले आहे. विराट कोहली-अनुष्का शर्मा, हार्दिक पांड्या-नताशा स्टेनकोविक, सागरीका घाडगे- जहिर खान, के एल राहूल-अथिया शेट्टी अशा अनेक जोड्या पाहायला मिळतात. आता त्यात पुजाची भर पडणार का? हे पहावे लागणार आहे.