Latest Marathi News

शेतकऱ्याची इंग्रजी जोमात, महावितरणचे अधिकारी कोमात

महावितरणच्या अधिकाऱ्याची शेतकऱ्याकडून इंग्रजी बोलत फजिती, व्हिडिओ व्हायरल

सांगली दि ८(प्रतिनिधी)- महावितरणने बिल न भरलेले वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. पण सांगलीत घडलेल्या एका प्रसंगामुळे वीज तोडणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच फजिती झाली आहे. वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या वीज महामंडळाच्या अधिकाऱ्याशी शेतकऱ्याने चक्क इंग्रजीतून संवाद साधला त्यांची बोलतीच बंद केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटलाची वाडीतील शेतकरी वेताळ चव्हाण यांनी महावितरणचे भरारी पथक आले होते. अभियंता सुनील पवार हे पथकासोबत होते.यावेळी वेताळ चव्हाण यांनी त्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपासाठी आकडा टाकून वीज घेतल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. याची विचारणा करण्यासाठी पवार चव्हाण यांच्याकडे गेले असता शेतकरी वेताळ चव्हाण यांनी कनेक्शन मिळत नसल्याने आपली व्यथा भरारी पथकातील कर्मचाऱ्याकडे इंग्रजीतून मांडली. “मी अनेकवेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली पण साहेब माझे ऐकून घेत नाहीत” अशी तक्रार चव्हाण यांनी केली. यावेळी पवार यांनीही वयस्कर शेतकरी चव्हाण यांच्याशी इंग्रजीमधून उत्कृष्ट संभाषण करत त्यांची तक्रार जाणून घेतली. त्यांचा हा संवाद महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रेकाॅर्ड केला होता पण आता तो जोरदार व्हायरल होत आहे.

आटपाडी तालुक्यामध्ये महावितरण विभागाने वीज चोरी रोखण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. या पथकाच्या माध्यमातून शेती पंपासाठी होणारी वीजचोरी विरोधात मोहिम राबवली जात आहे. पण वीजबिल भरण्यासाठी दबाब टाकणारे महावितरण वीज जोडणी देताना कशी दिरंगाई करते हेच शेतकऱ्यांने दाखवून दिल्याने महावितरणचे अधिकार खजील झालेले पहायला मिळाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!