Latest Marathi News
Ganesh J GIF

धावत्या एसटी बसमध्ये कंडक्टरला आला हार्ट अटॅक

बघा प्रवाशानी नेमक काय केल, प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

लातूर दि ८(प्रतिनिधी)- धावत्या बसमध्ये कंडक्टरला हार्ट अटॅक आल्यानंतर प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तातडीने प्राथमिक उपचार केल्याने कंडक्टरचा जीव वाचला आहे. प्रवशाने दाखवलेल्या या तत्परतेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी प्रवासाचे काैतुकही केले आहे.

एका चालत्या एसटी बसमध्ये अचानक कंडक्टरला हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी बसमधील प्रवाशांनी सतर्कता दाखवत, ड्रायव्हरला बस थांबवायला सांगितली आणि कंडक्टरला बसमधून खाली घेतले. आणि रस्त्यावर झोपवते छाती दाबण्यास सुरुवात केली. तसेच वारा घालत सीपीआर दिला. या तातडीने केलेल्या उपचारामुळे कंडक्टरचा जीव वाचला आणि तो शुद्धीवर आला. कंडक्टर पुर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत प्रवाशांनी त्यांचे प्रयत्न अखंडपणे सुरुच ठेवले होते. प्रवाशांनी दाखवलेल्या या सतर्कतेचं कौतुक होत आहे. ही सगळी घटना एका प्रवाशाने आपल्या कॅमे-यात कैद केली होती. आता ह. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण ही घटना कोणत्या मार्गावर घडली आहे याची माहिती मिळू शकली नाही.

 

याआधीही कंडक्टर किंवा ड्रायव्हरला धावत्या बसमध्ये हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. काही महिन्यापूर्वी सातारा जिल्ह्यात एका एसटी ड्रायव्हरचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. पण त्यावेळी तशा परिस्थितीतही बस बाजूला घेत त्या ड्रायव्हरने प्रवाशांचे जीव वाचवले होते. तर आता प्रवाशांनी कंडक्टरचा जीव वाचवला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!