Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात पुन्हा अग्नीतांडव, तीन जणांचा होरपळून मृत्यू

चार सिलेंडरचा स्फोट होऊन गोडावूनला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली. या आगीत ४ सिलेंडर फुटले आहेत. अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

पुणे शहरातील वाघोलीत शुक्रवारी रात्री उबाळे नगर येथे आग लागली. “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली होती. या आगीत ४ सिलेंडर फुटले आहेत. आगीनंतर त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश झाले. या घटनेत तीन तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेल नाही. आग नियंत्रणात आल्यानंतर आता कुलिंग करण्याचे काम सुरु आहे. शेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊन होते. परंतु योग्य वेळी आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील धोका टळला आहे. एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, “आपत्कालीन परिस्थितीत जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी चांगले काम केले. जवळच ४०० सिलिंडरचा साठा असलेले गोदाम होते. त्या ठिकाणी आग पसरू नये म्हणून खबरदारी घेतली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, अशी माहिती दिली.

पुण्यातील वाघोलीतच महालक्ष्मी लाॅन्ससमोरील दुकानाला आग लागली होती. त्यावेळी जिवितहानी टळली होती. पण मोठ्याप्रमाणात वित्तहानी झाली होती. पण आजच्या आगीत मात्र तीन जणांचा मृत्यू झाला होता. पण अलीकडच्या काळात पुण्यात आग लागण्याच्या घटनात वाढ झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!