Latest Marathi News

उपमुख्यमंत्र्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी

सीबीआयची मागणी न्यायालयाकडून मान्य, पहा नक्की काय आहे प्रकरण

दिल्ली दि २७(प्रतिनिधी)- कथित मद्य घोटाळय़ाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आयसीबीआयने सलग आठ तास चौकशीनंतर अटक केली होती आज त्यांना न्यायालयाने हजर केले असता पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.राऊज अवेन्यू कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे.

दिल्ली सरकारने व्यापाऱ्यांना फायदा होईल आणि सरकारला नुकसान होईल, असे मद्य धोरण बनवले. त्यासाठी दबाव आणला, असा आरोप उत्पादन शुल्क विभागाच्या एका आयएएस अधिकाऱ्याने केला होता. तसेच सिसोदिया यांच्या सांगण्यावरून कमिशन ५ कोटींवरून १२ कोटी रुपये करण्यात आले. त्याच्या चौकशीसाठी रिमांड आवश्यक असल्याचा मुद्दा सीबीआयने कोर्टात मांडला होता तो न्यायालयाने मान्य केला आहे. सीबीआयने मागितलेल्या मनीष सिसोदिया यांच्या कोठडीला त्यांचे वकील दयान कृष्णा यांनी विरोध केला होता.नायब राज्यपालांच्या मंजुरीनंतर कमिशनमध्ये वाढ करण्यात आली तसेच मद्य धोरणाच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता होती, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर कोर्टाने मनीष सिसोदिया यांच्या सीबीआयच्या कोठडीच्या मागणीचा निर्णय काही काळ राखून ठेवला होता. महत्वाचे म्हणजे दिल्ली सरकारने काढलेल्या मद्य परवाना धोरणाच्या प्रकरणात याआधी विजय नायर, समीर महेंद्रू आणि अभिषेक बोईनापल्ली यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान काल सिसोदिया रोड शो करत सीबीआय कार्यालयात पोहोचले होते. यावेळी सिसोदिया यांच्यासोबत हजारो समर्थक होते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध केला आहे. तर भाजपने आप आणि मनीष सिसोदिया यांच्यावर टीका करताना अटकेचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!