Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपाच्या या नेत्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाचले

विधानभवनातील त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, बघा काय घडले

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. पण त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या मदतीला भाजपाचा नेता धावून गेल्याचे पहायला मिळाले.

अधिवेशनाचे पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर विधानभवनाच्या इमारतीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांचे काही सहकारी बाहेर पडत होते. तेवढ्यात एका पायऱ्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचा पाय घसरला आणि तोल गेला. ते पडणार इतक्यात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांना सावरले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदेच्या मदतीला भाजपा धावल्याचे दिसून आले.योगायोग म्हणजे कालच मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांना अटक करण्यासाठी प्रयत्न केले होते असा गंभीर आरोप केला होता. आणि आज महाजन यांनी शिंदे यांना सावरल्यामुळे या योगायोगाची चांगलीच चर्चा रंगली होती.

 

भाजपा नेते गिरीश महाजन यांना भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाते. महाजन हे फडणवीस यांच्या खुपच जवळचे आहेत. अनेक अवघड जबाबदाऱ्या महाजन यांनी फत्ते केल्या आहेत.बाप मुले पळवणा-या टोळीचे सरदार म्हणून देखील त्यांना फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हटले जात होते. आता महाजन शिंदेच्याही जवळचे म्हणून ओळखले जात आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!