पुण्यात दुचाकीला वाचावताना बस स्टाॅपवरील पाच जणांना उडवले
पुण्यात अपघातांची मालिका सुरूच, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद, पुण्यात कुठे घडला अपघात
पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुण्यात सुरु असलेली अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज पहाटे पुन्हा एकदा पुण्यात भीषण अपघात झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातात तीन महिला आणि एका लहान मुलाला दुखापत झाली आहे.
पुण्यातील हिंगणे चाैकात ही अपघाताची घटना घडली. पुण्यातील विठ्ठवाडीकडून आनंदनगर दिशेने जात असताना क्रेटावरील चालकाचे नियंत्रण सुटले. यावेळी तिने बस स्टाॅपवर उभ्या असलेल्या महिलांना उडवले. जखमी झालेल्या महिला दुस-या वाहनाची वाट पाहत असताना एक भरधाव क्रेटा गाडी आनंद नगरहून हिंगणे चौकात आली. त्यानंतर गाडी यु टर्न घेऊन पुन्हा आनंद नगरच्या दिशेने निघाली. या गाडीमध्ये एक दांपत्य त्यांच्या दोन-तीन महिन्याच्या बाळासह होते. आनंद नगरच्या चौकात असलेल्या बालरोग तज्ज्ञ मानकर रुग्णालयात त्यांना जायचे होते. बस थांब्याच्या अलीकडे एक दुचाकी उलट्या दिशेने येत होती. त्यावर दोन महिला बसल्या होत्या. उलट्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला चुकवण्यासाठी चालकाने गाडी वळवली. मात्र, एक महिला मध्ये आल्याने गाडी चालकाचे नियंत्रण सुटले. त्यातच एक्सलेटर आणि ब्रेक यामध्ये चालकाचा पाय अडकला. त्यानंतर रिक्षाची वाट पाहत असलेल्या महिलांना गाडीने उडवले. सुदैवाने गाडीच्या पुढच्या भागात दुचाकी अडकल्याने गाडी तिथेच थांबली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या अपघातात रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन महिलांसह एक लहान मुलगा आणि एक पुरुष जखमी झाला आहे. ही अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला झाला आहे. या अपघातात जिवितहानी टळली आहे. मात्र सतत होणारे अपघात हा कळीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
पुण्यातल्या अपघाताचे केंद्रबिदू असणाऱ्या नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे. कात्रजकडून येणाऱ्या ट्रकचा नवले पुलाजवळ एक अपघात झाला आहे. या ट्रक ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. ताबा सुटल्यानंतर ट्रकची पुढील पाच ते सहा वाहनांना धडक दिली आहे.