Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्राची क्रश असणारी अभिनेत्री उतरणार राजकारणात?

अभिनेत्रीच्या सोशल मिडीया पोस्टची जोरदार चर्चा, नेटक-यांकडून उलटसुलट चर्चा, निवडणुक ही लढणार?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- आज दसरा सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. आज अनेक पक्षाचे दसरा मेळावे पार पडले. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील दसरा मेळावा पार पडला यावेळी मंचावर संगीतकार व गायक शंकर महादेवन यांच्याबरोबर मराठमोळी अभिनेत्री अभिनेत्री प्राजक्ता माळीदेखील दिसली. त्यामुळे याची जोरदार चर्चा होत आहे.

नागपूरमध्ये संघाचा दसरा मेळावा पार पडला.आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यादरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. नागपूरमध्ये विजयादशमीनिमित्त ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ने ‘विजयादशमी उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्राजक्ताने हजेरी लावली. ‘आज आयुष्यात पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा – विजयादशमी उत्सव अनुभवता आला. तेही केंद्रीय मंत्री – नितीनजी गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत. समस्त संघ परिवाराचे यासाठी मनापासून आभार.’ प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करीत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी ही खासकरुन मनसेच्या जवळची समजली जाते. कारण तिने अनेकदा राज ठाकरे यांचे काैतुक केले आहे. पण आज ती संघाच्या व्यासपीठावर दिसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे दरम्यान ती धनंजय मुंडे यांच्या एका कार्यक्रमातही दिसून आली होती. त्यामुळे प्राजक्ता राजकारणात सक्रिय होणार का अशी चर्चा होत आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत गुणी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनेत्रीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तसेच तिने प्राजक्तराज नावाने देखील सोन्याचा ब्रँड बाजारात आणला आहे. तसेच ती सोशल मिडीयावर देखील कमालीची सक्रिय असते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!