Latest Marathi News
Ganesh J GIF

सह्याद्रीच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाला ब्लॅक पँथर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रथमच काळ्या बिबट्याची नोंद झाली आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात २० एप्रिल रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये या दुर्मिळ प्राण्याचे छायाचित्र टिपले गेले.

२० आणि २१ एप्रिल रोजी वेगवेगळ्या बीटमध्ये तीन स्वतंत्र छायाचित्रे मिळाल्याने या भागात काळ्या बिबट्याची उपस्थिती निश्चित झाली आहे. यापूर्वी प्रकल्पात अशा प्रकारची नोंद कधीच झाली नव्हती.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अनेक दुर्मिळ आणि संकटग्रस्त सस्तन प्राण्यांचा आढळ आहे. परंतु, प्रकल्पामधून यापूर्वी काळ्या रंगाच्या बिबट्याची नोंद झालेली नव्हती. मात्र, बुधवार दि. २२ एप्रिल रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानात कॅमेरा ट्रॅप तपासण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांना काळ्या बिबट्याचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपलेले मिळाले.

२० आणि २१ एप्रिल रोजी तीन वेगवेगळी छायाचित्र ही वेगवेगळ्या बीटमध्ये टिपली गेली. त्यामुळे काळ्या बिबट्याची व्याघ्र प्रकल्पामधून पहिल्यांदाच नोंद झाली. या नोंदीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेला नवे महत्त्व प्राप्त झाले असून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा अत्यंत सकारात्मक आणि ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!