Latest Marathi News
Ganesh J GIF

माजी विश्वसुंदरीने घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट

महाराष्ट्रात तणावाचे वातावरण, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशचे शिष्टमंडळही उपस्थित, कारण अस्पष्ट

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सध्या तणावाचे वातावरण असताना मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का यांंनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटी दरम्यान मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या शिष्टमंडळही उपस्थित होते. या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


पोलंडची कॅरोलिना बिएलॉस्का ही मिस वर्ल्ड २०२१ ची विजेती आहे. मिस वर्ल्ड २०१९ ठरलेली जमैकाच्या टोनी-अॅन सिंगने तिला ७० वी मिस वर्ल्ड म्हणून मुकुट घातला होता. त्यावेळी भारताचे प्रतिनिधित्व करणारी मिस इंडिया मनसा वाराणसी पहिल्या १३ पर्यंत पोहोचली होती. पण अंतिम फेरीत ती पोहोचू शकली नव्हती. “जेव्हा मी माझे नाव ऐकले तेव्हा मला धक्काच बसला, मला अजूनही यावर विश्वास बसत नाही. मला मिस वर्ल्डचा मुकुट घालण्याचा मान मिळाला आहे आणि मी यावर थांबू शकत नाही. मला पोर्तो रिकोमधील हा आश्चर्यकारक क्षण उर्वरित काळासाठी लक्षात राहील” अशा भावना त्यावेळी कॅरोलीनाने व्यक्त केल्या होत्या. तसेच एक दिवस मला प्रेरणादायी वक्ता बनण्याची आशा आहे. तिच्या ब्युटी विथ पर्पज प्रोजेक्टला झुपा ना पिट्रीनी म्हणतात. हा प्रकल्प संकटात बेघर लोकांना सतत मदत पुरवते, या समस्येबद्दल जागरूकता वाढवते आणि सामाजिक बहिष्काराच्या विरोधात लढा देते. असेही कॅरोलिना म्हणाली होती.

महाराष्ट्रात दंगली होणार ही सातत्याने विरोधकांकडून होणारी विधाने आणि त्याला लगेच एका विशिष्ट समुदायाकडून मिळणारा प्रतिसाद, जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाच्या घटना, या कनेक्शनची चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान मिस वर्ल्ड सोबतच्या भेटीचा तपशील मिळू शकला नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!