Latest Marathi News
Ganesh J GIF

सारा नाही तर ही आहे क्रिकेटर शुभमन गिलची मिस्ट्री गर्ल

सोशल मिडीयावर दोघांचा हटके व्हिडीओ व्हायरल, दोघांनीही सांगितले खास सीक्रेट, बघाच

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसीचा फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात शुभमन गिल देखील खेळणार आहे. सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा राहिला आहे. तरी सोशल मिडीयावर मात्र शुभमन गिल चर्चेत आला आहे. कारण तो एक मिस्ट्री गर्ल सोबत एकदम रोमँटिक मूडमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा त्याकडे वळल्या आहेत. तसेच ती कोण आहे हे अनेकांना जाणून घ्यायचे आहे.


आयपीएलच्या सोळाव्या हंगामात शुभमन गिलने सर्वाधिक धावा करत आॅरेंज कॅप जिंकली आहे. नेटकरी कधी त्याचे नाव सारा तेंडुलकर, तर कधी सारा अली खानबरोबर जोडतात, परंतु या दोघींनीही शुबमनला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यातच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शुबमन गिल सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निहारिका एनएमशी बोलत आहे. व्हिडीओमध्ये निहारिका, शुभमनला विचारते, ‘तुला कोणता खेळ आवडतो…’ यावर शुभमन म्हणतो, ‘मी तर क्रिकेट खेळतो. पुढे शुभमन निहारिकाला विचारतो, ‘तुला सिनेमे पाहायला आवडतात, या प्रश्नावर उत्तर देत निहारिका म्हणते ‘मला सुपरहीरो टाईप सिनेमे आवडतात, निहारिकाच्या उत्तरानंतर शुभमन म्हणतो, ‘मी स्पायडर मॅनचा भारतीय व्हर्जन आहे. यावर निहारिका म्हणते ‘मला तुला एक सिक्रेट सांगायचं आहे, आजपर्यंत हे मी कोणाला सांगितलं नाही, मी प्रियांका चोप्रा आहे. निहारिका एनएम पुढे म्हणते की, मला स्पायडर मॅन चित्रपट खूप आवडतो, कारण या चित्रपटात अनेक चढ-उतार आहेत. नेटकरी दोघांच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. दरम्यान शुबमन गिल आयपीएल २०२३ च्या हंगामाचा ऑरेंज कॅप विजेता राहिला आहे. त्याने १७ सामन्यात ५९.३३च्या सरासरीने ८९० धावा केल्या. तसेच, त्याने तिनदा शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता.

निहारिका एनएम लॉस एंजिल्समधील एक भारतीय कंटेंट क्रिएटर आहे. ती अतिशय विनोदी पद्धतीने विविध विषयांवरील मत यु ट्युब व्हिडिओ आणि इंस्टाग्रामवर मांडत असते. इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केले तेव्हाच तिचे १०० के फॉलोअर्स होते. तिचे खाते सुरू केल्यानंतर दोन महिन्यांत तिने दहा लाखाचा टप्पा ओलांडला. इन्स्टावर सर्वात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल कंटेंट क्रिएटरपैकी ती एक आहे. विशेष म्हणजे आयसीएससीमध्ये तिला ९० टक्के गुण मिळाले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!