Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे- सोलापूर महामार्गावर बस कंटेनरच्या अपघातात चार जण ठार

अपघातात तीन पोलिस कर्मचाऱ्यांची कुटुंबे उध्वस्त, हडपसर पोलीस दलात हळहळ

पुणे दि १(प्रतिनिधी) – पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडे जाणाऱ्या लेनवर खाजगी बस बंद पडलेल्या ट्रकला मागून धडकून झालेल्या अपघातात पोलीस शिपायासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील काही गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात फारच भीषण होता.

हा अपघात चौफुलीजवळ वाखारी गावच्या हद्दीमध्ये झाला. अपघात झाला तेंव्हा बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. अपघातात पुणे शहर पोलीस दलामध्ये सायबर सेल मध्ये कार्यरत असलेले नितीन दिलीप शिंदे, आरती बिराजदार, अमित कलशेट्टी, गणपत पाटील अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अपघातानंतर यवत पोलिसांनी जखमींना केडगाव चौफुली व लोणी येथील विश्वराज रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मरण पावलेले नितीन दिलीप शिंदे हे पोलीस नाईक या पदावर हडपसर पोलीस स्टेशनला कार्यरत होते. ते एक उत्कृष्ट खेळाडू होते. ॲथलेटिक्स प्रकारात ते उत्कृष्ट रनर होते. नितीन शिंदे यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक उमदा व चांगला सहकारी अपघाती निधनात गेल्याची दुःखद भावना हडपसर पोलिसांकडून व्यक्त केली जात आहेत.

अपघातातील मृतांमध्ये २ पोलिसांचा समावेश या चार मृतांमध्ये एक पोलिस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीचाही यात मृत्यू झाला आहे. यामुळे तीन पोलिस कर्मचाऱ्यांची कुटुंबे या अपघातात उध्वस्त झाली आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!