Just another WordPress site

तरुणांची पीएमटी चालक वाहकासोबत फ्री स्टाईल हाणामारी

पुण्यात भर रस्त्यातच तुंबळ हाणामारी थरार, व्हिडीओ व्हायरल

पुणे दि १४(प्रतिनिधी) – पुण्यात पीएमटी चालकावर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात दोन तरुण आणि दोन पीएमटी चालकांची भर रस्त्यात तुंबळ हाणामारी झाली. किरकोळ कारणावरून सुरु झालेला वाद हाणामारी पर्यंत पोहोचला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पुण्यात रस्त्यावरून जाणाऱ्या बाईकवरील दोन तरुण आणि पीएमटी चालक यांच्यात जोरदार हाणामारी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट डेपोची बस पुणे स्टेशन परिसरात आली. यावेळी बसच्या जवळून दुचाकीवरुन दोन तरुण जात होते. तरुणांनी रागात आपली बाईक बसच्या पुढे लावली. त्यामुळे चालकाने त्यांना हटकले. यावरून दोघात वाद सुरु झाला पण अचानक बाईकवरील दोन तरुणांनी चपलेने पीएमटी चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बसवा वाहक त्याच्या मदतीला धावून आला. यावेळी दोन्ही पीएमटी चालक आणि तरूण यांच्यात लाथा बुक्क्यांनी हाणामारी सुरु झाली रस्त्यावरच सुरु झालेली हाणामारी नागरिकांनी हस्तक्षेप करत थांबवली पण या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला. पुण्यात पीएमटी चालकावर हल्ला होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पीएमटी चालक हल्लेखोरांचे साॅफ्ट टार्गेट ठरत आहेत. पण यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी दोघांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत.

GIF Advt

या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन तरुणांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात PMPL प्रशासनाने गुन्हा दाखल केला असून तरुणांना अटक करण्यात आली आहे. पण याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून पोलीसांचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!