Just another WordPress site

ही अभिनेत्री अजुनही पाहतेय तिच्या प्रिय व्यक्तीची वाट

चाहत्याच्या प्रश्नाला अभिनेत्रीचे बिनधास्त उत्तर बघा कोण आहे ती

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- मराठी मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने अलिकडे एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. बिग बाॅसमध्ये चाहत्यांबरोबर संवाद साधताना तिने बिनधास्त संवाद साधला आहे. तिचे उत्तर सध्या चर्चेत आहे.

काही महिन्यांपूर्वी अपूर्वाने इन्स्टाग्रामवर ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला.यावेळी तिने तिच्या चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिली होती. अपूर्वाला यावेळी नेटकऱ्यांनी विविध प्रश्न विचारले. तिनेही चाहत्यांच्या या प्रश्नाला मनमोकळेपणाने उत्तर दिली. या कार्यक्रमात अपूर्वाला ‘तू सिंगल आहेस की तुझं लग्न झालंय?’ असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता. त्यावर तिने बिनधास्त उत्तर दिले आहे. प्रश्नाला उत्तर देताना अपूर्वा म्हणाली, “मी सध्या तरी सिंगल आहे. त्यात मी आनंदी आहे. पण तरीही मी माझ्या प्रिय व्यक्तीची वाट बघतेय. तिचे हे उत्तर आणि याचा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल झाला होता. त्याची चर्चाही रंगली होती. अपुर्वाच्या ह्दयात नक्की कोण जागा पटकवणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

GIF Advt

अपूर्वा नेमळेकर ही बिग बॉस या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. अपूर्वा नेमळेकरची ‘आभास हा’ ही पहिली मालिका होती. त्याबरोबर ‘ती एका पेक्षा एक जोडीचा मामला’ यामध्येही झळकली होती. तिची ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेने तिला विशेष ओळख मिळवून दिली. पण तिने पहिल्यांदा खासगी आयुष्यावर केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!