Latest Marathi News
Ganesh J GIF

आजपासून २० जुन जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा होणार?

महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात थेट युनोची एंट्री, शिंदेच्या त्या बंडाची आज वर्षपूर्ती, बघा काय घडले?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी २० जूनला विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री एकनाथ शिंदे सोळा आमदारांसह नॉटरिचेबल झाले होते. आज त्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता या सत्तानाट्यात संयुक्त राष्ट्र संघटनेची एंट्री झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आजचा दिवस म्हणजेच २० जून हा जागतिक जागतिक गद्दार दिन जाहीर करा असं पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला लिहिले आहे. २० जून २०२२ रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे १६ आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर बरेच राजकीय नाट्य घडल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. तसेच शिवसेना पक्ष देखील शिंदेच्या हाती सोपवण्यात आला आहे. राऊत यांनी आपल्या पत्रात राज्यात राजकिय घडामोडी घडल्यानंतर शिंदे -फडणवीस सरकार स्थापन झाले. एका आमदाराने यासाठी ५० खोके (५० कोटी) रुपये घेतले त्यामुळे २० जून हा सर्व जगातील गद्दार दिन साजरा करण्यात यावा. यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल संयुक्त राष्ट्र संघटनने जाहीर केल्यानंतर २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय त्याप्रमाणे २० जून हा ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे युनो यावर काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

शिंदे गट आजचा दिवस स्वाभिमान दिन साजरा करणार आहे. तर ठाकरे गट जागतिक खोके दिन म्हणून पाळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस २० जून गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहे. मात्र मुंबई पोलीसांकडुन ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवत कोणताही कार्यक्रम घेण्यास मनाई केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!