Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नाला नकार दिल्याने तरुणीची चाकूने वार करुन हत्या

हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद, आईचा विरोध तरीही वार करतच राहीला, एकजणही मदतीसाठी धावला नाही

गुरुग्राम दि ११(प्रतिनिधी)- रिलेशनशिपमध्ये असताना लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने आपल्याच प्रेयसीची धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना गुरुग्राममधून समोर आली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

राजकुमार असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी पालम विहार येथून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार आणि तरुणीचा चार महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. पण साखरपुडा झाल्याच्या काही दिवसांनंतर तरुणीने राजकुमारसोबत लग्न करण्यास नकार दिला. विशेष म्हणजे साखरपुडा होण्याआधी ते दोघेही एकत्र रिलेशनमध्ये होते. लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणीची आई आणि नातेवाईकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. परिणामी साखरपुडा होऊनही लग्न मोडल्याने राजकुमार चांगलाच संतापला होता. तेव्हा तरुणीची आईही बरोबर होती. यावेळी राजकुमार आणि तरुणीमध्ये वादावादी झाली. याच रागातून राजकुमारने तरुणीवर चाकूने हल्ला केला. तरुणीच्या आईने राजकुमारला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. राजकुमारने केलेल्या हल्ल्यात तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर मयत तरुणीच्या आईने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तसेच राजकुमारलाही घरीच कोंडून ठेवलं. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत राजकुमारला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान मृत तरुणी आणि आरोपी राजकुमार उत्तर प्रदेशातील बदाऊन येथील रहिवाशी आहे. तरुणी घरकाम करत होती.

दिल्लीतील साक्षी या तरुणीची प्रियकराकडून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा तशीच घटना समोर आली आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी इतरही लोक उपस्थित होते पण त्यांच्यापैकी कोणीही आरोपीला रोखण्याचे धाडस दाखवू शकले नाही. आता व्हिडिओच्या आधारावर पालम विहार पोलिसांकडून या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!