Latest Marathi News
Ganesh J GIF

कोकण हार्टेड गर्लचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल

अभिनेत्रीकडे मराठी कलाकाराने मागितले इच्छामरण, चित्रपटसृष्टीची दुखरी बाजू समोर, व्हिडिओने डोळे पाणावतील

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- कोकण हर्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी सोशल मिडीया स्टार अभिनेत्री अंकिता वालावलकर हिची फॅन फाॅलोईंग प्रचंड आहे. ती सोशल मिडीयावर चांगलीच सक्रिय असते. सध्या तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये मराठी कलाकाराची व्यथा मांडण्यात आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी ही व्यथा मांडताना चक्क इच्छामरण मागितले आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावकर शुटिंगसाठी गिरगावला गेली होती. तिने एका मराठी कलाकाराना मदत करताना त्यांची व्यथा महाराष्ट्रासमोर मांडली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत अंकिता म्हणते, “गिरगांवमध्ये माझं एक शूट सुरू होतं, त्या शूटिंग दरम्यान मला तिथे माहिमकर काका भेटले होते. त्यांना मी लहानपणापासूनच स्क्रीनवर पाहत आली आहे. मी त्यांना काका तुम्ही आमच्या शूटमध्ये येणार का? अशी विनंती केली. त्यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवून लगेचच तयार होऊन आले सुद्धा. पण माझी शूटिंग झाल्यानंतर मी निघत असताना माहिमकर काका मला म्हणाले, “मुली माझ्यासाठी काही काम मिळेल का? सध्या मला कामाची खूप गरज आहे. माझं लग्न झालेलं नाही, वेळ घालवायला ही माझं कुटुंब नाही. मला इच्छामरणही चालेल, पण या देशात तशी सोय नाही. मला नुसत्या पैशाची गरज नाही. मला असं काम हवंय, जेणेकरून माझा वेळ जाईल. अंकिताने हा व्हिडिओ शुट करुन सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. यातून माहिमकर काकांना कुठेतरी काम मिळेल असा तिचा अंकिताला विश्वास आहे. दरम्यान एकेकाळी अनेक सिनेमा-नाटकात काम करणारा या अभिनेत्यावर तिच्याकडे काम मागण्याची वेळ आल्याने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘माझ्यासाठी रखुमाई बनून उभी रहा मुली. मला काम हवंय!! ही वाक्य मला झोपू देणार नाहीत, त्यामुळेच मी रिल करायचं ठरवलं’, असं कॅप्शन देत अंकिताने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्येष्ठ मराठी टेलिव्हिजन अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!