
‘पेहलवान, कराटेवाले यांना आमदारकी द्या म्हणजे चांगली फ्रीस्टाईल होईल’
''या' मोठ्या नेत्याच्या पत्नीची आमदारांच्या हाणामारीवर उपरोधिक प्रतिक्रिया
मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- मनसेच्या सदस्य नोंदणी मोहीमेला आजपासून सुरूवात झाली. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी याबद्दल बोलताना तुम्हाला चांगला महाराष्ट्र घडवायचा असेल तर आमच्यासोबत या नोंदणी करा, असं आवाहन केलं आहे.
मुंबईत प्रसार माध्यमांधी बोलताना ‘विधिमंडळ अधिवेशनात आमदारांमध्ये झालेली हाणामारी खूपच लज्जास्पद असल्याचे सांगत शर्मिला ठाकरेंनी यांनी मी तर सगळ्या पक्षांना अपील करेल की पुढच्या वेळेला आपले पेहलवान, जुडोवाले, कराटेवाले यांना आमदारकी द्या म्हणजे अजून चांगली फ्रीस्टाईल होईल, असा टोला शर्मिला ठाकरेंनी लगावला आहे. यावेळी कोणी किती खोके घेतले एवढंच महत्त्वाचं आहे. हे सगळं बाजूला ठेवा आणि लोकांचे काय हाल आहेत ते बघा, असं देखील शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.
मनसेच्या सदस्य नोंदणी मोहीमेला सुरुवात झाली असुन राज ठाकरेंनी आपली नोंदणी करत सदस्य नोंदणीचा शुभारंभ केला. आत्ताच्या राजकीय परिस्थितीत मनधरणी आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणार आहे. त्यासाठी मनसेने सद्स्य नोंदणी मोहीम सुरु केली आहे.