Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रसूतीदरम्यान पोटात सोडले हँडग्लोव्ह्ज; ४ सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू

बीड येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १९ वर्षीय संध्या सूरज गायकवाड या महिलेच्या सिझेरियन प्रसूतीदरम्यान डॉक्टरांनी निष्काळजीपणा करत तिच्या पोटात हँडग्लोव्ह्ज आणि ड्रेसिंग पट्टी (कागदी रुमाल) तशीच ठेवल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

प्रकरणातील मुख्य अपडेट्स:

लातूर पथकाकडून झाडाझडती: लातूरचे सहाय्यक संचालक डॉ. संजय ढगे यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय समितीने बीड जिल्हा रुग्णालयात चौकशी सुरू केली आहे. गेल्या चार तासांहून अधिक काळापासून ऑपरेशन थिएटर, लेबर रूम आणि सिझेरियन वॉर्डमधील डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.

ससून रुग्णालयाचा अहवाल महत्त्वाचा: बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश कुमार सोळंके पुण्यातील ससून रुग्णालयाचा अधिकृत अहवाल आणण्यासाठी रवाना झाले आहेत. हा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाईची दिशा स्पष्ट होईल.

रुग्णाची प्रकृती चिंताजनक: प्रसूतीनंतर चार दिवसांनी महिलेच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. इन्फेक्शन गंभीर पातळीवर पोहोचल्याने तिला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर तातडीने दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या तिची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.

या प्रकरणात चौकशी समितीच्या अहवालानंतर दोषी डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!