Latest Marathi News
Ganesh J GIF

राज्यपाल भगतसिंग कोशारी राजीनामा देणार

पंतप्रधानांना पाठवले पत्र, पहा काय म्हटले आहे पत्रात

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचे राज्यपाल म्हणाले आहेत. यासंदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती देण्यात आली आहे.

राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळविल्याची माहितीही राज्यपालांनी दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदमुक्त करण्याबाबत दिल्लीत वरिष्ठांशी बोलणे केले असून याबाबत दिल्लीतील हायकमांड याचा निर्णय घेणार आहेत. सध्या महाराष्ट्रात भगतसिंह कोश्यारी यांचा नवा वाद नसल्याने हीच योग्य वेळ साधत येत्या आठवड्याभरात राज्यपाल कोश्यारींना केंद्रीय गृह मंत्रालय त्यांना परत बोलावू शकते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!