Latest Marathi News
Ganesh J GIF

अमृता फडणवीस यांच्या धमकीमागे गुजरात कनेक्शन

अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर केंद्राची एंट्री, धमकी प्रकरणाला मनी लाँड्रिंगचे वळण

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या कथित लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातही अनिल जयसिंघानी हा सहआरोपी असून त्याला आता अहमदाबादमध्ये ईडी युनिटने अटक केली आहे.दरम्यान आयपीएल मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे.

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणातील बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आता अहमदाबादच्या ईडी पथकाने  त्यांच्यावर कारवाई केली आहे. जयसिंघानी हा मुंबईजवळील उल्हासनगरचा असून तो १५ हून अधिक प्रकरणांमध्ये संशयित आहे. ५ राज्यात वॉन्टेड, ८ वर्षांपासून फरार क्रिकेट बुकी म्हणून ओळख असलेल्या जयसिंघानीयाला गुजरातमधून अटक करण्यात आली होती. सट्टेबाजी प्रकरणात त्याला तीन वेळा अटक झाली आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जयसिंघानी यांच्या मुलीविरोधात लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. अनिक्षा हिने अमृता फडणवीस यांना विनंती केली की, वडिलांवर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यांना गुन्हे किंवा तक्रारीमधून वाचवावे. मात्र या गोष्टीला अमृता फडणवीस यांनी नकार दिल्याने अनिक्षाने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनिक्षाने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. अनिक्षा सध्या जामीनावर बाहेर आहे. त्यानंतर अनिल जयसिंघानी यांनेही मुंबई उच्च न्यायालयात बेकायदेशीर अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने शुक्रवारी याचिका फेटाळून लावली होती.ईडीकडून अहमदाबाद कोर्टात सुरु असलेल्या २०१५ मधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जयसिंघानी याची चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असताना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर न्यायालयात जयसिंघानी यांच्या कोठडीची मागणी केली आहे.


जयसिंघानी यांना नुकतेच मध्यप्रदेश पोलिसांनी कथित बुटलेगिंग प्रकरणात ताब्यात घेतले होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा एका फेडरल एजन्सीद्वारे तपास सुरु असताना ईडीने जयसिंघानीवर ही कारवाई केली आहे. त्यामुळे जयसिंघानीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!