Latest Marathi News
Ganesh J GIF

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना अटक होणार?

फडणवीसांना फडतूस म्हटल्यामुळे होणार कारवाई, राणेंच्या अटकेचा दिला दाखला

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस असे संबोधल्याने उद्धव ठाकरे यांना या प्रकरणात अटकच करावी, अशी मागणी किरण पावसकर यांनी केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. फडतूस हे वक्तव्य उद्धव ठाकरे यांना भोवण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना किरण पावसकर म्हणाले, हे फडतूस म्हणाले, आणखी काय काय बोलले. वेगवेगळ्या पद्धतीने तेच बोलत आहात. इतरांनी कुणी एक बोललं तर त्यावर ताबडतोब कारवाई होते. माझी मागणी आहे, आतापर्यंतचं सगळं वर्तन बघता, राज्य शासनाने उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी. त्यांनापण अटक करावी.त्यांच्या काळात नारायण राणे यांनी उपशब्द वापरला म्हणून जेवणाच्या ताटावरून उचलत अटक केलीत आता तर ते केंद्रीय मंत्री आहेत. तर त्यांना अटक होऊ शकते. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना बोलल्याबद्दल ठाकरे यांना अटक व्हावी. न्याय हा सगळ्यांना समान हवा. एकास एक आणि दुसऱ्याला दुसरा असा नको. असे म्हणत पावसकर यांनी ठाकरेंना अटक करण्याची मागणी होत आहे. तर कंगना राणावत आणि केतकी चितळे यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या वागणुकीमुळेच मातोश्रीला शाप लागला, असेही पावसकर म्हणाले आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडतूस असे म्हणत टीका केली होती. त्यावरून राज्यात आधीच मोठा गदारोळ झाला आहे.

आमदार अस्लम शेख आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री, पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संगनमताने मालाड येथे अनधिकृत स्टुडिओ बांधण्यात आले. पालिकेने या स्टुडिओवर हातोडा मारला. अवैध बांधकाम प्रकरणी सर्वसामान्यांवर कारवाई केली जाते, मग यांच्यावर का केली जाऊ नये, असा सवालही किरण पावसकर यांनी विचारला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!