Just another WordPress site

‘गुलाबराव पाटलांना गोधडी दाखवून देतो’

गुलाबराव पाटलांना शिवसेनेच्या या नेत्याचे आव्हान,भाजपावरही निशाना

संभाजीनगर दि १० (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी “आम्ही शिवसेनेत होतो तेव्हा आदित्य ठाकरे गोधडीतही नव्हते,” असं म्हणत टीका केली होती. त्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. “पान टपरीवाल्याला गोधडी दाखवतो” असे म्हणत पाटलांना आव्हान दिले आहे.

चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांसमोर बोलताना पाटलांचा समाचार घेतला खैरे म्हणाले की, “तो फालतू पानटपरीवाला भाषणात मी बाळासाहेबांमुळे मोठा झालो म्हणायचा. आता उद्धव ठाकरेंच्या मुलाला तुम्ही असं बोलता.गुलाबराव पाटलांना गोधडी दाखवून देतो. संभाजीनगरमध्ये ये, तुझी हिंमत पाहतो. भ्रष्टाचार किती केला हे माहिती आहे. आम्ही सोडणार नाही” असा इशारा दिला आहे. शिवाय ठाकरेंच्याबाबतीत कोणी असं बोलत असेल तर सहन करणार नाही असेही खैरे यांनी स्पष्ट केले आहे.यावेळी त्यांनी भाजपावरही निशाना साधला. बाळासाहेबांमुळेच मोदी वाचले अशी आठवन त्यांनी करुन दिली आहे.

GIF Advt

ते ३२ वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतं. तू गोधडीत पण नव्हता, तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत.अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर निशाना साधला होता. आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढत बंडखोर आमदारांवर टिका केली होती. त्यामुळे बंडखोर आमदारांनी आदित्य ठाकरेंवर टिका चालू केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!