
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होताना दिसतोय.निवडणूक बिनविरोध न झाल्याने सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं रहावं लागलं. अशातच आता त्यांचा विजय जवळजवळ निश्चित होताना दिसत आहे. तर विरोधात असणाऱ्या करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले यांचं डिपॉजिट जप्त होण्याची शक्यता आहे. अभिजित बिचुकलेला किती मतं मिळाली? जाणून घ्या.सुनेत्रा पवार ऐतिहासिक विजयाच्या उंभरठ्यावर.पोस्टल मतमोजणीपासून सुनेत्रा पवारांनी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत मतमोजणीच्या एकूण सात फेऱ्या पार पडल्या आहेत. सातव्या फेरीअखेर सुनेत्रा पवारांनी 63186 मतांची आघाडी घेतली आहे. सुनेत्रा पवार ऐतिहासिक विजयाच्या उंभरठ्यावर आहेत.

अशातच आता सातव्या फेरीनंतर अभिजित बिचुकले याला तोंड दाखवायची देखील जागा उरली नाहीये. निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनंतर चौथ्या फेरीनंतर बिचुकलेला फक्त 33 मतं मिळाली आहेत.114 लोकांचं नोटाला मत.न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच सोलापूरमधील आर. वाय घुटूकडे यांनी सुनेत्रा पवारांविरुद्ध टिकाव लावला आला नाही. त्यांना चौथ्या फेरीनंतर 159 मतं मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार विराज शिंदे यांना 99 मतं मिळाली आहेत. तसेच करुणा मुंडे यांना चौथ्या फेरीनंतर 51 मतं मिळालीत. तसेच चौथ्या फेरीच्या अखेरपर्यंत 114 लोकांनी नोटाला मत देणं पसंत केलंय.

23 उमेदवार रिंगणात.दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्यानं 23 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकाही उमेदवार नाही. यामध्ये 21 अपक्ष उमेदवार आहेत. त्यामध्ये बारामतीमधील 8 जणांचा समावेश आहे, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावातील एक अपक्ष उमेदवार देखील उभा आहे तर, धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांचा समावेश आहे.


