Latest Marathi News
Ganesh J GIF

अपात्रतेच्या कारवाईची शक्यता असणारे ते १६ आमदार कोण?

त्या आमदारांची यादी समोर, उरलेल्या २४ आमदारांचे काय? काय असणार शक्यता?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा उद्या निकाल लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या सुनाचणीकडे असणार आहे. पण त्याचबरोबर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय देखील उद्या होणार आहे. पण शिवसेनेचे ४० आमदार पक्ष सोडुन गेले असताना कारवाई मात्र १६ जणांवरच केली जाणार ते १६ आमदार कोण याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

उद्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालय १६ आमदारांना अपत्रा ठरवार की त्यांच्या बाजून निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या निकालाचा सरकारवर जरी परिणाम होणार नसला तरीही स्वतः शिंदे आणि मंत्रिमंडळातील काही मंत्री यांना आपले पद सोडावे लागण्याची शक्यता आहे. सत्ता संघर्षाच्या या सर्व सुनावणीदरम्यान 16 आमदारांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मनाला जात आहे. त्यामुळे आता उद्या न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे ते १६ आमदार कोण असा प्रश्न होता तर त्या १६ आमदारांची यादी पाहूया.

१.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
२.आमदार तानाजी सावंत
३.आमदार अब्दुल सत्तार
४.आमदार यामिनी जाधव
५.आमदार संदीपान भुमरे
६.आमदार भरत गोगावले
७.आमदार संजय शिरसाठ
८.आमदार लता सोनावणे
९.आमदार प्रकाश सुर्वे
१०.आमदार बालाजी किणीकर
११.आमदार बालाजी कल्याणकर
१२.आमदार अनिल बाबर
१३.आमदार संजय रायमूलकर
१४.आमदार रमेश बोरनारे
१५.आमदार चिमणराव पाटील
१६.आमदार महेश शिंदे

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मात्र शिंदेंसोबत गेलेल्या उर्वरित २४ आमदारांचं काय होणार? याचीही उत्सुकता सगळ्यांना आहे. याबाबत कायदेतज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. पण जर या आमदारांनाही अपात्र ठरवण्यात आले तर मात्र विद्यमान सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!