Latest Marathi News
Ganesh J GIF

हडपसर पोलिसांची कोयता गँगवर कारवाई

आरोपींच्या आवळल्या मुसक्या, नागरिकांकडुन पोलिसांच्या कारवाईचे काैतुक

पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुण्यातील हडपसर परिसरातील मांजरी भागात कोयता गॅंंगची दहशत वाढल्यामुळे नागरिकांनी हडपसर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर पोलिसांनी कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे.

हडपसर मध्ये गुंडगिरीने चांगलेच डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येतं आहे. काही दिवसापुर्वी मांजरी परिसरात कोयते घेऊन तरुणांना तसेच व्यापाऱ्यांना धमकावण्याचा प्रकार घडला होता.यावेळी काही नागरिक आणि व्यापाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. या संदर्भात नागरिकांनी हडपसर पोलीस ठाणे गाठत कारवाईची मागणी केली होती. या अनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास पीएसआय अविनाश शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शिवाय गुन्हेचे पोलीस निरिक्षक सगळे, तपास पथकाचे सपोनि विजय शिंदे आणि नाईट आॅफिसर एपीआय सोमनाथ पडसलकर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली होती. त्यानंतर तातडीने तपासाची सूत्रे फिरवत कोयता गँगमधील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे यापूर्वी कुठल्याही गुन्ह्याची नोंद आढळून आली नाही.

कोयता गॅंंगमुळे हडपसर परिसरातील व्यापारावर फार मोठा प्रभाव पडला होता. त्याचबरोबर लहान मुलांनाही धमक्या येत होत्या. त्यामुळे भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती.पण हडपसर पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने आरोपींना अटक करण्यात आली आहे यामुळे व्यापारी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलीसांकडुन इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!