जुळ्या बहिणींशी लग्न करणे अतुलला महागात पडणार?
द्विभार्या प्रतिबंधक कायदा अडचणी वाढवणार?, बघा काय आहे कायदा
सोलापूर दि १३(प्रतिनिधी)- सोलापूरच्या अतुल नावाच्या तरुणाने मुंबईतील पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींसोबत विवाह केला. त्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. पण दोन लग्नामुळे अतुलला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एखादा व्यक्ती दोन लग्न करु शकतो असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्याचाच धुंडोळा आज घेणार आहोत.
अतुलच्या विवाहाची दखल महिला आयोगाने दखल घेतली असून याबाबतची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आयोगाने केली आहे. शिवाय अतुलवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय अतुलवर द्विभार्या प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी होत आहे. तर जाणून घेऊया हा द्विभार्या प्रतिबंध कायदा नेमका काय आहे.
द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार हिंदू विवाहित पुरुष, पहिल्या पत्नीपासून विभक्त न होता दुसरं लग्न करू शकत नाही. जरी हिंदू पुरुषानं पहिली पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न केलं तर त्याच्या दुसऱ्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळत नाही. हे कायदा कलम ४९४ म्हणून ओळखला जातो. एखादी व्यक्ती यात दोषी आढळल्यास, अशा व्यक्तीला न्यायालयाने जास्तीत जास्त ७ वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद आहे. तसेच दोषीला ठोठावण्यात येणारा दंड हा संबंधित कोर्ट ठरवते. पहिलं लग्न झालेल्या व्यक्तीला जर दुसरं लग्न करायचे असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीला पहिल्या पती/पतीला १९५५ च्या हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोट घेणे अनिवार्य आहे.
अतुलच्या बाबतीत न्यायालयाने अतुलच्या लग्नामुळे पीडित झालेली व्यक्ती म्हणजे जुळ्या बहिणींपैकी कोणी असेल किंवा संबंधित लग्न करणाऱ्याचे पाहिले लग्न झाले असेल आणि पहिल्या बायकोने तक्रार दिली असेल, तर तपास करा असा आदेश कोर्टाने दिला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई किंवा तपास केला जातो अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. त्यामुळे अतुल समोरच्या अडचणी वाढल्या आहेत.