Latest Marathi News
Ganesh J GIF

एकही खड्डा नसलेला या शहरातील रस्ता पाहिला का?

रस्त्यावरून राजकारण होत असताना या रस्त्याचे होतेय काैतुक

पुणे दि २४ (प्रतिनिधी)- रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न आजकाल सर्वच शहरातील रस्ते पाहून पडत असतो. मुंबई असो की पुणे स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाऱ्या या शहरातील रस्त्यांची अवस्था अश्मयुगातली आठवण देणारी असते.रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीव गेल्याच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत. पण अस असताना एका शहरातील एका रस्त्यावर गेल्या ४६ वर्षांपासून एकही खड्डा पडलेला नाही.

हा चमत्कार घडवणारे शहर आहे पुणे अस म्हणतात ना पुणे तिथे काय उणे याची आठवण पुण्यातील हा रस्ता पाहुन येते. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील जंगली महाराज मठ ते डेक्कनपर्यंत असलेल्या या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. १९७६ सालापासून या रस्त्यावर वाहने धावत आहेत. या रस्त्यावर कायम वर्दळ असते. पण त्यानंतरही गेल्या ४६ वर्षांमध्ये या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. तसंच हा रस्ता कधीही खोदावा लागलेला नाही.मुंबईच्या रिकांडो कंपनीने हा रस्ता अवघ्या १५ लाखात बनवलेला आहे. हा रस्ता बनवताना कंपनीने काही अटी घातल्या होत्या. त्या म्हणजे पुणे महापालिकेनं या रस्त्यावर एकही खिळा ठोकू नये.त्याचबरोबर या रस्त्यावर मांडव उभारणीसाठी खड्डे खोदण्यासही मनाई करावी.ड्रेनेज, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, पाईपलाईन या सारख्या वेगवेगळ्या कामासाठी हा रस्ता खोदला जाऊ नये.याची हमी दिल्यानंतरच हा रस्ता बांधण्यात आला होता. म्हणूनच ४६ वर्षानंतरही हा रस्ता उत्तम अवस्थेत आहे.

रस्ता आणि दुरावस्था हे हमखास दिसणारे समीकरण आहे. त्याचबरोबर पाऊस पडला की पावसाळ्यात रस्त्यावरचे खड्डे आणखी मोठे होतात. त्या खड्ड्यावरून गाडी चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या जाहिरनाम्यात, राजकीय भाषणांमध्ये खड्डेमुक्त रस्त्याचं आश्वासन देतात.पण ती फोल ठरतात त्यामुळे हा रस्ता नक्कीच इतर रस्ते बनवताना आदर्श ठरू शकतो.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!